Shreya Maskar
हैदराबादमधील हुसेन सागर हे आशियातील सर्वात मोठ्या मानवनिर्मित (कृत्रिम) तलावांपैकी एक आहे. हुसेन सागर तलाव तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद येथे आहे.
१६ व्या शतकात मुसी नदीच्या उपनदीवर इब्राहिम कुली कुतुब शाहच्या कारकिर्दीत हुसेन शाह वली यांनी बांधला. हा तलाव हैदराबाद आणि सिकंदराबाद ही जुळी शहरे जोडतो.
हुसेन सागर या तलाव बुद्ध मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. तलावाच्या मध्यभागी 'जिब्राल्टर रॉक'वर १९९२ मध्ये उभारलेला १६ मीटर उंचीचा गौतम बुद्धांचा भव्य अखंड पुतळा हे मुख्य आकर्षण आहे.
हुसेन सागर तलाव हृदयाच्या आकाराचे आहे. हुसेन सागर तलावाला 'हार्ट ऑफ द वर्ल्ड' असेही संबोधिले गेले आहे.
हैदराबादचा पाणीपुरवठा आणि सिंचनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या तलावाची निर्मिती करण्यात आली होती.
हुसेन सागर तलावाकडे गेल्यावर बोटिंग, जलक्रीडा यांचा आनंद घेता येतो. येथे आजूबाजूला लुंबिनी पार्क, संजीवय्या पार्क, आणि इंदिरा पार्क या पर्यटन स्थळांचा समावेश आहे.
हैदराबादमधील हुसेन सागर तलावाच्या काठावर असलेल्या लुंबिनी पार्क मध्ये रोज संध्याकाळी आकर्षक लेझर शो आणि म्युझिकल फाउंटन पाहता येतो. येथे तुम्ही सुंदर फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.