Shreya Maskar
न्यू इयर वीकेंडला ट्रिप प्लान करत असाल तर नांदगाव बीच सुंदर लोकेशन आहे. येथे जाताच तुमच्या कामाचा थकवा दूर होईल आणि तुम्ही मस्त मजा कराल.
नांदगाव बीच रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातच वसलेला आहे. तो एका शांत, गर्दी नसलेल्या किनारा आहे.
नांदगाव बीचला गेल्यावर पांढरी वाळू, निळाशार समुद्र आणि नारळाची झाडे पाहायला मिळतात. तुम्ही येथे जलक्रीडांचा आनंद घेऊ शकतो.
नांदगाव बीच मुरुड-जंजिरा किल्ल्याजवळ आहे. तसेच नंदगाव समुद्रकिनारा हा काशिदजवळ निसर्गरम्य ठिकाण आहे.
नांदगाव बीच सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहण्यासाठी उत्तम लोकेशन आहे. तुम्ही येथे कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता.
नांदगाव बीचजवळ एक प्रसिद्ध आणि जागृत सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे. त्यामुळे येथे तुम्हाला मंगलमय वातावरण अनुभवता येईल.
हिवाळ्यात येथे थंड वातावरण अनुभवता येते. ज्यामुळे येथे तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता. जोडीदारासोबत फिरण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.