Surabhi Jayashree Jagdish
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर कार्डियाक अरेस्टबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे. माहितीनुसार, गोव्यातील घरी त्यांना छातीत तीव्र वेदना झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, कार्डियाक अरेस्ट हे कारण सांगितलं जातंय.
कार्डियाक अरेस्ट ही अचानक उद्भवणारी गंभीर वैद्यकीय स्थिती आहे, ज्यात हृदयाची धडधड अचानक थांबते किंवा हृदय शरीरात रक्त प्रभावीपणे पंप करू शकत नाही. काही वेळा व्यक्ती कोणतीही मोठी पूर्वसूचना न देता अचानक बेशुद्ध पडू शकते आणि काही मिनिटांत परिस्थिती गंभीर होऊ शकते.
कार्डियाक अरेस्टमध्ये हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये अचानक बिघाड होतो. त्यामुळे हृदय सामान्य पद्धतीने धडधडत नाही आणि शरीरात रक्त पंप होणं थांबतं. परिणामी मेंदू आणि शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांना ऑक्सिजनयुक्त रक्त मिळत नाही.
कार्डियाक अरेस्टचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हृदयाची धडधड अचानक अनियमित होणं. हृदयाच्या इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळे हृदय योग्य पद्धतीने धडधडत नाही. त्यामुळे हृदय शरीराच्या अवयवांपर्यंत पुरेसं रक्त पोहोचवू शकत नाही.
हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये आजार असणं किंवा याआधी हार्ट अटॅक आलेला असणं यामुळे कार्डियाक अरेस्टचा धोका वाढू शकतो. हार्ट फेल्युअर किंवा हृदयाचे इतर आजार असलेल्या व्यक्तींमध्येही हा धोका वाढू शकतो.
शरीरात ऑक्सिजनची खूप कमतरता झाल्यास हृदय आणि इतर महत्त्वाच्या अवयवांच्या कामावर गंभीर परिणाम होऊ शकतो. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव किंवा गंभीर संसर्ग झाल्यासही परिस्थिती बिघडू शकते.
कार्डियाक अरेस्टच्या आधी प्रत्येक व्यक्तीमध्ये स्पष्ट संकेत दिसतीलच असं नाही आणि काही जण अचानक बेशुद्ध पडू शकतात. काही लोकांमध्ये छातीत दुखणं किंवा दाब जाणवणं, श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणं, अचानक अशक्तपणा, हृदयाची धडधड वाढणं किंवा अनियमित होणं, मळमळ किंवा उलटी अशी लक्षणं दिसू शकतात.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.