Shreya Maskar
उन्हाळ्यात वीकेंडला मुंबईजवळील नालासोपारा या ठिकाणाला भेट द्या. येथे निसर्गाच्या सानिध्यात सुंदर पिकनिक स्पॉट्स लपलेले आहेत.
नालासोपारा जवळील कळंब बीच विरंगुळ्याचे उत्तम ठिकाण आहे. काळ्या वाळूचा विशाल किनारा आणि सूर्यास्ताची नयनरम्य दृश्ये पाहायला पर्यटक येथे येतात.
विरार येथे राजोडी समुद्रकिनारा वसलेला आहे. हा शांत आणि स्वच्छ बीच आहे. येथे तुम्हाला उंटांची सफरी करता येते. तसेच बोटिंगचा आनंद घेता येतो.
चिंचोटी धबधब्याला जाण्यासाठी तुम्ही नालासोपारा स्टेशनला उतरा आणि तेथून रिक्षाने पुढे जा. तुम्हाला छोटी जंगल सफारीचा आनंद घेता येईल. पावसाळ्यात धबधब्याचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
तुंगारेश्वर मंदिर हे प्राचीन शिवमंदिर आहे. टेकडीवरील त्याचे शांत व निसर्गरम्य स्थान , सभोवतालचे वन्यजीव अभयारण्य यासाठी हे ठिकाण ओळखले जाते. ट्रेकिंगसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
अर्नाळा किल्ला हा १६ व्या शतकातील एक ऐतिहासिक जलदुर्ग आहे.अर्नाळा किनाऱ्यावरून बोटीने (फेरीने) थोडासा प्रवास करून या किल्ल्यावर पोहोचता येते; येथील विहंगम सागरी दृश्ये, प्राचीन मंदिरे आणि गोड्या पाण्याच्या विहिरी यांमुळे हा किल्ला पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
अर्नाळा बीचवर काळ्या वाळूच्या लांबच लांब किनारपट्टी पाहायला मिळते. अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावरून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. जवळच रिसॉर्ट्स आहेत. येथे वीकेंड प्लान करा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.