Nail Polish Health Risks: नेल पॉलिश लावल्याने वाढतो स्लो पॉयझनचा धोका? काय होतो शरीरावर परिणाम?

Sakshi Sunil Jadhav

नेल पॉलिशचा ट्रेंड

मुलींच्या फॅशनमधला सर्वात महत्वाचा आणि आवडीचा भाग म्हणजे नेल पॉलिश लावणं.

nail polish health risks

शरीरावर होणारा गंभीर परिणाम

सध्या लग्नसोहळ्याचे दिवस सुरु आहेत. या दिवसांमध्ये मुली किंवा महिला नेल पॉलिश लावतातच. पण याचा तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

nail polish health risks

चुकीचा समज

मुळात नखं हा कठीण भाग आहे. त्यावर काहीही लावलं तर परिणाम होत नाही. हा समज चुकीचा असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.

toxic chemicals in nail polish

तज्ज्ञांचे मत

तज्ज्ञांच्या मते, नखं मृत पेशींनी बनलेली असतात. त्यावर लावलेल्या पदार्थांचा शरीरावर परिणाम होत नाही. पण नखं छिद्रयुक्त असल्याने रसायनं रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचू शकतात.

toxic chemicals in nail polish

नेल पॉलिशमधील रसायने कोणती?

नेल पॉलिशमध्ये फिल्म फॉर्मर्स, रेझिन, प्लास्टिसायझर्स, सॉल्व्हेंट्स आणि पिगमेंट्सचा वापर केलेला असतो. हेच घटक रंग आणि चमक टिकवून ठेवण्याचं काम करतात.

toxic chemicals in nail polish

टॉक्सिक ट्रायोचा मोठा धोका

डिब्युटिल फ्थॅलेट, टोल्युईन आणि फॉर्मल्डिहाइड ही तीन रसायने सगळ्यात धोकादायक मानली जातात. त्यामुळे हार्मोनल बिघाड, डोकेदुखी, चक्कर आणि त्वचेच्या समस्या जाणवू शकतात.

slow poison nail polish

कॅन्सरचा धोका

फॉर्मल्डिहाइड हे कॅन्सरकारक रसायन मानलं जातं. जास्तवेळ संपर्कात राहिल्याने श्वसनाचे आजार आणि त्वचेची ॲलर्जी होण्याची शक्यता वाढते.

slow poison nail polish

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

slow poison nail polish

NEXT: Jio युजर्ससाठी खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Jio 3599 plan
येथे क्लिक करा