Nail Cancer: नखांच्या कॅन्सरची सुरूवातीची लक्षणं कोणती? वेळीच व्हा सावध

Priya More

नखांचा कॅन्सर

नखांमध्ये झालेला बदल कॅन्सर देखील असू शकतो. त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे असते. त्यासाठी तुम्हाला सुरूवाची लक्षणं माहिती असणे गरजेचे आहे.

Nail Cancer | Social Media

तपकिरी रंगाची रेषा

नखांवर मधोमध किंवा कडेला काळ्या, गडद तपकिरी रंगाची उभी रेषा तयार होते. हळूहळू ही रेषा मोठी होत जाते.

Nail Cancer | Social Media

रक्ताची गाठ

नखाला कोणतिही इजा किंवा दुखापत झालेली नसताना देखील नखाखाली रक्ताची गाठ तयार होते. नखांवर काळा किंवा तपकिरी डाग दिसतो.

Nail Cancer | Social Media

नखं ठिसूळ होतात

नखांचा कॅन्सर झाल्यास नखं ठिसूळ होतात. नखं कमकुवत होऊन तुटतात. कधी कधी नखं तडकतात.

Nail Cancer | Social Media

त्वचेचा रंग बदलतो

नखांचा कॅन्सर असेल तर नखांच्या शेजारच्या त्वचेचा रंग बदलतो. त्वचेचा रंग काळा किंवा गडद दिसतो.

Nail Cancer | Social Media

नखं पूर्णपणे निघून जाते

नखाचा कॅन्सर असल्यास नखं पूर्णपणे निघून जाते. नख त्वचेपासून वेगळे होते किंवा मुळापासून उचलले जाते.

Nail Cancer | Social Media

सूज येते

नखांचा कॅन्सर असल्यास नखांच्या कडेला तीव्र वेदना होतात. नखांच्या कडेच्या मासाला सूज येते.

Nail Cancer | Social Media

नखाखाली गाठ

नखांचा कॅन्सर असल्यास नखाखाली छोटीशी गाठ तयार होऊन त्यातून रक्त येते किंवा जखम होऊन ती भरली जात नाही.

Nail Cancer | Social Media

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. साम टिव्ही याचं समर्थन करत नाही.

Nail Cancer | Social Media

NEXT: पुरूषांनाही होतो ब्रेस्ट कॅन्सर, 'या' १० लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

Breast Cancer | Saam Tv
येथे क्लिक करा...