Priya More
ब्रेस्ट कॅन्सर हा फक्त महिलांनाच होतो असे नाही. तर पुरूषांना देखील ब्रेस्ट कॅन्सर होतो.
स्तनातील पेशींची वेगाने आणि असामान्य वाढ होते आणि त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.
ब्रेस्ट कॅन्सर सामान्यत: महिलांना होतो. ९९ टक्के याची प्रकरणं महिलांमध्ये आढळतात. पुरूषांमध्ये या कॅन्सरची प्रकरणं कमी आहेत.
ब्रेस्टमध्ये गाठ असल्यास ब्रेस्टमधून रक्त किंवा द्रवाचा स्राव होत असेल तर पुरूषांनी याकडे दुर्लक्ष करू नये.
निप्पल आतमध्ये जाणे, ब्रेस्टच्या त्वतेमध्ये बदल होणे याकडे देखील पुरूषांनी दुर्लक्ष करू नये.
बऱ्याचदा ब्रेस्ट कॅन्सरमध्ये काखेत, गळ्याभोवती सूज येते आणि वेदना होतात. अचानक वजन देखील कमी होते.
ब्रेस्ट कॅन्सर असल्यास थकवा जाणवतो, हाडांमध्ये असह्य वेदना होतात, जेवण जात नाही.
स्तनातील कोणत्याही गाठी किंवा बदलांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर तपासणी आणि योग्य उपचारांमुळे रोगाचे लवकर निदान होण्यास मदत होऊ शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. साम टिव्ही याचं समर्थन करत नाही.