Priya More
नाभीमध्ये तीळ, खोबरेल, बदाम, एरंडेल तेल सोडल्याने अनेक फायदे होतात. त्याप्रमाणे मोहरीचे तेल सोडल्याने देखील जास्त फायदे होतात.
रात्री झोपण्यापूर्वी मोहरीच्या तेलाचे २ थेंब नाभीमध्ये सोडल्याने शरीराला एक नाही तर अनेक फायदे होतात. असं केल्याने फक्त १५ दिवसांत तुम्हाला रिझल्ट दिसेल.
मोहरीच्या तेलाचे २ थेंब नाभीत सोडल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पोटाशी संबंधित आजार दूर होतात.
पोटदुखी किंवा गॅसची समस्या असेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी नाभीमध्ये २ थेंब मोहरीच्या तेलाचे सोडा.
मोहरीच्या तेलामध्ये उष्ण गुणधर्म असतात. हिवाळ्यात नाभीमध्ये २ थेंब मोहरीच्या तेलाचे सोडल्यामुळे शरीराला नैसर्गिक उष्णता मिळते.
जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही नाभीमध्ये दोन थेंब मोहरीच्या तेलाचे सोडा. नाभीभोवती या तेलाने तुम्ही मसाज देखील करू शकता.
जर तुमची त्वचा सतत कोरडी पडत असेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचे दोन थेंब नाभीत सोडा. यामुळे त्वचा मऊ होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. साम टिव्ही याचं समर्थन करत नाही.