Priya More
भारतीय महिला स्वयंपाक घरात थोडसं काम केले तरी थकतात आणि त्यांची चिडचिड होते.
भारतीय महिला स्वयंपाक घरात काम करताना थकतात यामागचे खरे कारण समोर आले आहे.
तज्ज्ञांच्या मते, भारतीय महिला स्वयंपाक घरात थकतात या मागचे कारण म्हणजे स्वयंपाकघराची रचना आणि अयोग्य मांडणी हे आहे.
भारतात अनेक स्वयंपाकघरे सुंदर दिसण्यासाठी डिझाइन केलेली असतात. पण सिंक, रेफ्रिजरेटर आणि स्टोव्ह यांच्यामध्ये योग्य अंतराच्या अभावामुळे भारतीय महिलांची अनावश्यक धावपळ होते.
'किचन वर्क ट्रँगल'च्या नियमाचे पालन करून ही अनावश्यक धावपळ आणि थकवा सहजपणे कमी केला जाऊ शकतो.
किचन ट्रँगलचा सर्वात महत्त्वाचा नियम हा आहे की, रेफ्रिजरेटर, सिंक आणि स्टोव्ह यांच्यातील अंतर खूप जास्त किंवा खूप कमी नसावे.
रेफ्रिजरेटर, सिंक आणि स्टोव्ह या तिघांमधील अंतर किमान ५ पावले आणि कमाल ८ पावले असावे. यामुळे स्वयंपाक घरात कोणतेही काम करताना विनाकारण चालणे टाळता येते.
रेफ्रिजरेटर, सिंक आणि स्टोव्ह योग्य अंतरावर आणि त्रिकोणी आकारात मांडलेले असल्यास तुमची कामं अधिक जलद आणि सोप्या पद्धतीने पूर्ण होतात.
रेफ्रिजरेटर, सिंक आणि स्टोव्ह योग्य अंतरावर असेल तर स्वयंपाकघरात वारंवार फेऱ्या माराव्या लागत नाहीत. यामुळे पाठदुखी, पायदुखी आणि मानसिक थकवा येत नाही.
स्वयंपाकघराची योग्य रचना फक्त काम सोपे करत नाही तर काम करणाऱ्या महिलांचा मूड देखील सुधारतो.