Shreya Maskar
संत्र्यांची बर्फी बनवण्यासाठी संत्री, मिल्क पावडर, दूध, मलई, संत्री, किसलेले खोबरे, ड्रायफ्रूट्स, ब्राऊन शुगर, वेलची पावडर इत्यादी साहित्य लागते.
संत्र्यांची बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम संत्र्यांची साल सोलून त्यातील पांढरा भाग वेगळा करून एका बाऊलमध्ये एकत्र करा.
आता एका पॅनमध्ये तूप, मलई आणि मिल्क पावडर टाकून मिक्स करून घ्या.
मिश्रण थंड झाल्यावर वेलची पूड घालून मिश्रण सतत ढवळत रहा.
मिश्रणात संत्र्यांचा पांढरा भाग आणि साखर घालून मंद आचेवर शिजू द्या.
आता यात चिरलेले ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करा.
त्यानंतर किसलेले खोबरे आणि किसलेली संत्र्याची साल घाला.
आता हे सर्व मिश्रण प्लेटमध्ये टाकून संत्र्याची बर्फी ५ तास रेफ्रिजरेटरमध्ये सेट करायला ठेवा.