Shreya Maskar
काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी काकडी, दही, लाल मिरची पावडर, जिरेपूड, कोथिंबीर, पुदिना, काळे मीठ, चाट मसाला, कांदा आणि टोमॅटो इत्यादी साहित्य लागते.
काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून किसून घ्यावी.
कांदा आणि टॉमेटो बारीक चिरून घ्यावे.
आता एका बाऊलमध्ये किसलेली काकडी , दही आणि पाणी टाकून मिक्स करून घ्या.
या मिश्रणात लाल मिरची पावडर, जिरे पूड, चाट मसाला आणि मीठ टाका.
त्यानंतर यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने टाकावी.
आता छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता आणि हिंग टाकून फोडणी तयार करावी.
काकडीच्या कोशिंबीरवर तयार फोडणी टाकून गरमागरम भातासोबत काकडीच्या कोशिंबीरचा आस्वाद घ्या.