ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नागपूर हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर जिल्ह्यांपैकी एक आहे. येथे फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. जे पर्यटकांना आकर्षित करतात.
नागपूरच्या जवळच नैसर्गिक सौंदर्यांने नटलेले चिखलदरा हिल स्टेशन आहे. हे सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात.
या हिल स्टेशनची नैसर्गिक सुंदरता आणि शांततापूर्ण वातावरण तुमची ट्रिप अविस्मरणीय करतील.
समुद्रसपाटीपासून १०८८ मीटर उंचीवर वसलेले या हिलस्टेशनची मनमोहक नयनरम्ये दृश्ये पर्यटाकासाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
चिखलदरा हिल स्टेशनला तुम्ही कोणत्याही ऋतुला भेट देऊ शकता.
तुम्ही चिखलदरा हिल स्टेशन जवळ पंचबोल पॅाइंट, भीमकुंड किचकदरा, गवळीगड किल्ला, हरिकेन पॅाईंट, मेळघाट या प्रसिद्ध ठिकाणांना भेट द्या.
नागपूरपासून चिखलदरा हिल स्टेशन अंतर २२१ किलोमीटर अंतरावर आहे.