ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केळी हे फळ अनेकांना आवडतं. केळीमध्ये अनेक पोषक तत्व आहेत. ज्यामुळे आरोग्यला अनेक फायदे होतात.
लाल केळीला कोलोराडो केळी, क्यूबन केळी, रेड डक्का आणि ढाका केळी नावानेही ओळखले जाते.
लाल केळीमध्ये पिवळी केळीच्या तुलनेत जास्त पोषक तत्व असतात. परंतु तुम्हाला याचे जबरदस्त फायदे माहित आहे का, जाणून घ्या.
लाल केळीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. तसेच कार्बोहायड्रेट आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे अधिक वेळेपर्यंत भूख लागत नाही.
लाल केळी खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते. आणि अॅनिमिया सारख्या आजारापासून आराम मिळतो.
लाल केळीमध्ये नैसर्गिक साखरचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. जे शरीराला उर्जा प्रदान करते. ज्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो.
यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्च मुबलक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे त्वचा चमकदार होते.