नागपंचमीला बनवा अस्सल पारंपारिक 'पुरणाचे दिंड'; जाणून घ्या ही मराठमोळी रेसिपी

Manasvi Choudhary

नागपंचमी

श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे. नागपंचमी हा सण श्रावणातील पहिला सण आहे. श्रावणातील प्रत्येक सणाला घरोघरी मराठमोळे पदार्थ आवर्जून बनवले जातात. नागपंचमीच्या दिवशी पुरणाचे दिंड ही रेसिपी बनवली जाते.

Nagpanchami | Yandex

अस्सल पारंपारिक रेसिपी

अस्सल मराठमोळ्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी ही रेसिपी सोप्या पद्धतीने बनवू शकता.

Nagpanchami Special Recipe

साहित्य

दिंड करण्यासाठी चणा डाळ, गूळ, जायफळ पावडर, वेलची पावडर, केशर, गव्हाचे पीठ हे साहित्य तयार ठेवा.

Nagpanchami Special Recipe

डाळ शिजवून घ्या

पुरणाचे दिंड बनवण्यासाठी सर्वातआधी चणा डाळ स्वच्छ धुवून घ्या. गॅसवर कुकरमध्ये चणाडाळ शिजवून घ्या.

Nagpanchami Special Recipe

गूळ मिक्स करा

डाळ शिजल्यानंतर गॅसवर कढईमध्ये गूळ मिक्स करा. नंतर या मिश्रणात उकडून घेतलेली डाळ मिक्स करा.

Jaggery | yandex

मसाले मिक्स करा

पुरण तयार करण्यासाठी त्यात जायफळ पावडर, वेलची पावडर, केशर घाला म्हणजे पुरणाला चांगली चव आणि स्वाद येईल. यानंतर पुरण यंत्रामध्ये घालून पुरणाची बारीक पेस्ट करा.

Nagpanchami Special Recipe

कणिक मळून घ्या

गव्हाचे पीठ कणिक मळून घ्या आणि त्यावर झाकण ठेवा. साधारण १५ ते २० मिनिटांनी कणकेचा गोळा छोट्या आकारात लाटून घ्या.

Nagpanchami Special Recipe

दिंड तयार करा

त्यात पुरण भरा आणि चारही बाजू दुमडून घ्या. अशापद्धतीने दिंड तयार होईल. नंतर इडली पात्र घ्या त्याला तूप लावा. तूप लावल्यानंतर त्यात दिंड ठेवून १० ते १५ मिनिटे वाफवून घ्या.

Nagpanchami Special Recipe

अस्सल पारंपारिक रेसिपी तयार

अशाप्रकारे घरच्या घरी अस्सल पारंपारिक पद्धतीचे दिंड तयार होईल.

Nagpanchami Special Recipe

NEXT: चैत्र, वैशाख, श्रावण... मराठी महिन्यांची नावं कशी पडली? वाचा हा जुना इतिहास

Marathi Months Name History
येथे क्लिक करा..