Shreya Maskar
नगरधन किल्ला हा नागपूरजवळ रामटेकपासून जवळ आहे. हा ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. जो वाकाटक काळापासून अस्तित्वात असून नंतर नागपूरच्या भोसले राजांनी त्याचे नूतनीकरण केले.
नगरधन किल्ला विदर्भातील प्राचीन इतिहासाचा आणि स्थापत्यकलेचा महत्त्वाचा पुरावा आहे. नगरधन किल्ला वाकाटक काळापासून 'नंदीवर्धन' म्हणून ओळखला जातो.
नागपूरच्या पूर्व दिशांचे रक्षण करण्यासाठी नगरधन किल्ला महत्त्वाचा होता. येथे लहान मुलांना घेऊन नक्की जा.
नगरधन किल्ला प्राचीन इतिहास, वाकाटक आणि भोसले राजवंशांची वास्तुकला दर्शवतो, कारण तो वाकाटक साम्राज्याची राजधानी होता. याला मोठे ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे.
नगरधन किल्ला आणि रामटेक मंदिर हे दोन्ही नागपूरजवळ आहेत. जिथे रामटेक हे धार्मिक व ऐतिहासिक स्थळ आहे. येथील खिंडसी तलाव जे जलक्रीडा आणि निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
मजबूत तटबंदी, बुरुज आणि भव्य प्रवेशद्वार आहे. तळघरात देवी दुर्गेचे मंदिर आहे. जे किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे.
नगरधन किल्ला ट्रेकिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे, नागपूरजवळ असल्याने सोपा ट्रेक स्पॉट आहे. तुम्ही येथे मित्रांसोबत नक्की भेट द्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.