Shreya Maskar
नाचणीची भाकरी बनवण्यासाठी नाचणी पीठ, पाणी, मीठ, तेल, कोमट पाणी इत्यादी साहित्य लागते.
नाचणीची भाकरी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करा.
पाणी गरम झाल्यावर त्यात मीठ घालून उकळून घ्या.
त्यानंतर यात नाचणी पीठ घालून पाण्याने हळूहळू कणिक मळून घ्या.
तयार पीठ १०-१५ मिनिटे बाजूला ठेवा. जेणेकरून पीठ चांगले मऊ होईल.
तयार पिठाचे छोटे गोळे करून प्लास्टिक शीटवर कोरडे पीठ टाकून हाताने भाकरी थापून घ्या.
तवा गरम करून भाकरी दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या.
पिठलं, भाजी, ठेचासोबत गरमागरम नाचणीच्या भाकरीचा आस्वाद घ्या.