Shreya Maskar
दाबेलीसाठी बनवण्यासाठी बटाटे, दाबेली मसाला, तेल, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, गरम मसाला, कांदा, कोथिंबीर, मीठ, चिंचेची चटणी, लसणाची चटणी, शेंगदाणे आणि शेव इत्यादी साहित्य लागते.
दाबेलीसाठी भाजी बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
या मिश्रणात हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि दाबेली मसाला घालून मिक्स करा.
पुढे यात मॅश बटाटे आणि मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या.
शेवटी यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
आता पावाला बटर लावून त्यात तयार चटपटीत भाजी भरा.
पावाला चिंचेची चटणी, लसणाची चटणी लावा.
चटणी लावल्यावर त्यात शेंगदाणे, कांदा, डाळिंब आणि शेव टाकून दाबेलीचा आस्वाद घ्या.