Shreya Maskar
उरलेल्या भातापासून इडली बनवण्यासाठी उरलेला भात, मीठ, रवा, दही, इनो, लाल तिखट, कढीपत्ता, मोहरी, जिरं आणि हिंग इत्यादी साहित्य लागते.
उरलेल्या भातापासून इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात भात टाकून बारीक पेस्ट तयार करून घ्या.
मिश्रणात एक वाटी दही आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
फोडणी देण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं आणि हिंग घालून व्यवस्थित एकजीव करा.
फोडणीत बारीक चिरलेला कांदा, मीठ, लाल तिखट परतून घ्या.
तयार फोडणी भाताच्या मिश्रणात टाकून त्यात इनो मिक्स करा.
मिश्रण इडली पात्रात टाकून गरमागरम इडली बनवा.
नारळाच्या चटणीसोबत उरलेल्या भातापासून बनवलेल्या इडलीचा आस्वाद घ्या.