Shruti Vilas Kadam
नाचणीत कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते, जे हाडांना मजबूत करतं. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि महिलांसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे.
नाचणीमध्ये हाय फायबर आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे डायबेटिस असलेल्यांसाठी उपयुक्त.
नाचणी भाकरी खाल्ल्याने पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे जास्त खाण्याची इच्छा होत नाही. हे वजन कमी करणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे.
यामध्ये भरपूर फायबर असल्यानं पचनक्रिया सुरळीत होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
नाचणीत पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते, जे उच्च रक्तदाब कमी करण्यात मदत करतं.
यामध्ये लोह (Iron) भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं आणि अशक्तपणा कमी होतो.
नाचणीत असलेले अँटीऑक्सिडंट्स, अमिनो अॅसिड्स आणि जीवनसत्त्वे त्वचा उजळवतात आणि केस मजबूत करतात.