ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भागीरथी नदी उत्तरकाशीतील गोमुख येथून उगम पावते.
देवप्रयाग येथे अलकनंदा आण भागीरथी नदीचा सुंदर संगम होतो, पुढे तिला गंगा नदी म्हणून ओळखले जाते.
राजा भगीरथ यांनी गंगा नदीला स्वर्गातून पृथ्वीवर आणण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. यांच्या नावावरून भागीरथी नदीचे नाव ठेवण्यात आले आहे,
राजा भगीरथाच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान ब्रह्मदेवाने देवी गंगेला पृथ्वीवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
ब्रम्हदेवाच्या या निर्णयानंतर, देवी गंगा पृथ्वीवर अवतरली. यानंतर या नदीला भागीरथी नदी असे नाव ठेवण्यात आले.
गंगेचा वेग जास्त असल्याने पृथ्वी ती सहन करू शकणार नाही, म्हणून भगवान शकरांनी गंगेला आपल्या जटांमध्ये धारण केले.
यानंतर गंगा नदीला हळू हळू पृथ्वीवर प्रवाहित करण्यात आली. पुढे ही नदी भागीरथी नदी म्हणून ओळखण्यात आली.