Shreya Maskar
मैसूर पाक बनवण्यासाठी बेसन, साखर, तूप, पाणी आणि ड्रायफ्रूट्स काप इत्यादी साहित्य लागते.
मैसूर पाक बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये साखर आणि पाणी उकळवून घ्या.
गॅस मंद आचेवर ठेवून साखर सतत ढवळत रहा आणि एक तारेचा पाक तयार करावा.
यात बेसन थोडे थोडे घालून चांगले मिक्स करा.
सतत मिश्रण ढवळत रहा आणि एक चमचा तूप टाका.
जेव्हा बेसन तूप शोषून घेणे बंद करेल, तेव्हा मैसूर पाक तयार झाला आहे.
एका प्लेटला तूप लावून मिश्रण पसरवून घ्या.
१ तासानंतर त्याच्या वड्या पाडून ड्रायफ्रूट्सचे तुकडे वरून टाका.