Shreya Maskar
मसाला चहा बनवण्यासाठी पॅनमध्ये मसाला वेलची, लवंग, काळी मिरी, दालचिनी, जायफळ, तुळशीच्या मंजिरी भाजून घ्या.
भाजलेले पदार्थ मिक्सरच्या भांड्यात टाकून पावडर बनवा.
त्यानंतर मिक्सरला आलं , सुंठ घालून बारीक करा. अशाप्रकारे गावरान स्टाइल चहा मसाला तयार झाला.
चहा बनवण्यासाठी पाणी आणि चहा पावडर उकळण्यासाठी ठेवा.
त्यानंतर यात साखर आणि दूध घालून उकळून घ्या.
पाणी चांगले उकळल्यावर यात तयार चहा मसाला टाका.
आता चहाला एक उकळी काढून कपात ओता.
गरमागरम मसाला चहाचा खारी-बिस्कीटसोबत आस्वाद घ्या