Shruti Vilas Kadam
कढईत बेसन मंद आचेवर ४-५ मिनिटे भाजून घ्या. बेसनाचा कच्चा वास गेल्यावर ते एका बाजूला ठेवा.
कढईत साखर आणि थोडे पाणी घालून पाक तयार करा. पाकाला हलकी एकतारी येईपर्यंत तो उकळू द्या.
तयार पाकात भाजलेले बेसन थोडेथोडे घालत सतत ढवळत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
मिश्रणात गरम केलेले तूप थोडेथोडे घालत सतत ढवळा. प्रत्येक वेळी तूप मिश्रणात व्यवस्थित मिसळू द्या.
मिश्रण कढईच्या कडांपासून सुटू लागले आणि त्यात बारीक छिद्रे दिसू लागली की मैसूर पाक तयार होण्याच्या स्थितीत आहे.
तूप लावलेल्या ताटात हे मिश्रण ओता आणि वरून सपाट करा. काही मिनिटे थंड होऊ द्या.
मिश्रण पूर्ण थंड होण्याआधीच सुरीने चौकोनी किंवा डायमंड आकाराचे तुकडे करा. थंड झाल्यावर स्वादिष्ट मैसूर पाक तयार.