Dark Underarms Tips: काळपट अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी ७ टिप्स; अशी घ्या काखेच्या त्वचेची काळजी

Shruti Vilas Kadam

कोरफडीचा गर वापरा

कोरफडीचा गर त्वचेला ओलावा देण्यास मदत करू शकतो. कोरफड जेलचा थोडा भाग त्वचेवर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. जळजळ किंवा खाज जाणवल्यास वापरणे थांबवा.

Dark Underarms Tips

हळद, बेसन आणि दह्याचा पॅक

थोडे बेसन, चिमूटभर हळद आणि दही एकत्र करून पेस्ट तयार करा. त्वचेवर हलक्या हाताने लावा आणि काही मिनिटांनी पाण्याने धुवा.

Dark Underarms Home Remedies

काकडीचा वापर करा

काकडीची पेस्ट किंवा थंड काकडीचे काप त्वचेवर काही वेळ ठेवल्याने थंडावा मिळू शकतो. मात्र, यामुळे त्वचेचा रंग उजळतो.

Dark Underarms Home Remedies

बदामाच्या तेलाने त्वचेची काळजी घ्या

बदामाच्या तेलाचा थोडा वापर त्वचेतील ओलावा टिकवण्यासाठी मदत करू शकतो. तेलाची ॲलर्जी असल्यास ते वापरू नका.

Dark Underarms Home Remedies

ओट्सचा वापर करा

ओट्स आणि पाणी एकत्र करून मऊ पेस्ट तयार करता येते. ती त्वचेवर हलक्या हाताने लावून धुवा. काखेची त्वचा नाजूक असल्यामुळे जोरात स्क्रब करू नका.

Dark Underarms Home Remedies

केस काढताना योग्य काळजी घ्या

रेझर किंवा हेअर रिमूव्हल क्रीममुळे त्वचेवर जळजळ आणि घर्षण होऊ शकते. त्यामुळे केस काढल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावा.

Dark Underarms Home Remedies

घट्ट कपडे आणि त्रासदायक डिओडरंट टाळा

घट्ट कपड्यांमुळे होणारे घर्षण कमी करण्यासाठी सैल, मऊ कपडे वापरा. डिओडरंट लावल्यानंतर खाज किंवा जळजळ होत असल्यास त्याचा वापर थांबवा. काखेतील काळेपणा अचानक वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Dark Underarms Home Remedies

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Black Underarms Tips

Oily Skin Makeup Tips: मेकअप केल्यानंतर चेहरा तेलकट दिसतोय? वापरून पाहा 'या' सोप्या टिप्स

Oily Skin Makeup Tips | Saam Tv
येथे क्लिक करा