Shreya Maskar
मैसूर मसाला डोसा बनवण्यासाठी तांदूळ, तूर डाळ, उडीद डाळ, रवा, मेथी दाणे, बटाटे, कांदा, आलं-लसणाची पेस्ट, कोथिंबीर, तेल, जिरे-मोहरी, कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य लागते.
मैसूर मसाला डोसा बनवण्यासाठी तांदूळ, तूर डाळ, उडीद डाळ, मेथी इत्यादी पदार्थ ४-५ तास भिजत ठेवून मिक्सरला वाटून घ्या.
डाळ आणि तांदूळ वाटून झाल्यावर त्यात रवा, मीठ आणि पाणी टाकून मिश्रण रात्रभर भिजत ठेवा.
उकडलेले बटाटे मॅश करून घ्या.
आता मिक्सरला कांदा, आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि हिरवी मिरची वाटून घ्या.
पॅनमध्ये तेल टाकून जिरे , मोहरीची फोडणी देऊन त्यात कांदा आणि सर्व पेस्ट भाजून घ्या.
तयार झालेली फोडणी मॅश बटाट्यांमध्ये टाका.
आता डोशामध्ये बटाट्याचे मिश्रण भरून नारळाच्या चटणीसोबत डोशाचा आस्वाद घ्या.