Shreya Maskar
आयुर्वेदामध्ये हिरडा औषधी मानला जातो.
हिरडामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. हिरडाची पावडर गरम पाण्यात घालून प्यायल्यास शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते.
हिरडामधील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सपासून होणारे नुकसान कमी करतो. तसेच गरम पाण्यासोबत हिरडा खाल्ल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.
हिरडामध्ये मेटाबॉलिजम वाढवणारे घटक असतात. ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते. परिणामी वजन कमी होण्यास मदत होते.
रिकाम्या पोटी हिरडा खाल्ल्यास आपली पचनक्रिया सुधारते. गॅस, अॅसिडिटीचा त्रास होत नाही.
हिरडामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळतात. ज्यामुळे आजाराशी लढायला ताकत मिळते. याचे नियमित सेवन केल्यास आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते.
नियमित हिरडाचे सेवन केल्यास स्नायू दुखी कमी होते आणि हाडे देखील मजबूत होतात.
हिरडा खाल्ल्यास शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.