Chetan Bodke
पायाला दुखापत झाल्यामुळे नसा खेचू लागल्यावर पायात अचानक गोळा येतो, त्यामुळे पायाला सुज येते.
सूज आल्यानंतर कधी गरम पिशवीने शेक दिल्याने किंवा मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने पायाला आराम मिळतो.
घरगुती उपाय म्हणून तुम्ही पायाची मोहरीच्या तेलाने मालिश केल्यामुळे बराच आराम मिळतो.
मोहरीचे तेल आणि हळदचे मिश्रण करून सूजलेल्या भागावर मालिश करावी. हळदीमुळे पायाची सूज लवकर उतरते.
पायाची सूज लवकर उतरवण्यासाठी मोहरीच्या तेलात लवंगाचे दाणे टाकावे.
हे मिश्रण थोड्या प्रमाणात गरम करून सूजलेल्या भागावर मालिश करावी. यामुळे सूज उतरते आणि रक्ताप्रवाहही सुधरवतो.
मोहरीचे तेल आणि आले गरम करून पायाला लावल्याने पायाला आराम मिळतो. आलं खाल्ल्यानेही शरीराला आराम मिळतो.
अनेकांच्या पायाला त्रास थंडीमुळे किंवा लागल्यामुळे होतो. हा घरगुती उपाय आपल्याला आरामदायी ठरू शकतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.