Manasvi Choudhary
धावपळीच्या जीवनशैलीत कंबरदुखी ही अत्यंत सामान्य पण त्रासदायक समस्या बनली आहे.
ऑफिसमध्ये तासनतास एकाच जागी बसून काम करणे, चुकीच्या पद्धतीने बसणे किंवा चालणे, संगणकासमोर सतत वाकून काम करणे किंवा अचानक स्नायूंवर ताण येणे यामुळे कंबरेचे दुखणे वाढते.
कंबरदुखी थांबवण्यासाठी तुम्ही गोळ्या- औषधांऐवजी घरगुती उपाय करून पाहा. मोहरीच्या तेलाचा सर्वात सोपा उपाय आहे.
मोहरीच्या तेलामध्ये अँटी-इन्फ्लमेटरी आणि उष्ण गुणधर्म असतात, जे स्नायूंना शिथिल करतात.
एका लहान भांड्यात मोहरीचे तेल घ्या आणि ते कोमट करा.
गरम केलेल्या तेलात कापूर पावडर मिक्स करा.
कोमट तेलाने मालिश केल्यामुळे कंबरेच्या भागातील रक्ताभिसरण सुधारते.
कापूर मुळे सूज कमी होण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.