Ruchika Jadhav
महिलांची पर्स विविध वस्तूंनी गच्च भरलेली असते. यामध्ये अनेक गरजेच्या वस्तू देखील असतात.
महिलांच्या बॅगध्ये मेकअपसह रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तू देखील असतात.
विविध वस्तूंसह महिलांनी बॅगमध्ये सेफ्टी पिन ठेवणे फार महत्वाचं आहे.
सेफ्टी पिनचा आपल्याला बराच उपयोग होतो. याने अनेक बिघडलेली कामे दुरुस्त होतात.
प्रवासात अचानक काही वेळा कपडे फाटतात, अशावेळी आपल्याकडे फाटलेला कपडा बंद करण्यासाठी तात्पुरती सेफ्टी पिन असणे आवश्यक आहे.
चालताना काहीवेळा चप्पल सुद्धा तुटतात. चप्पल तुटल्याने अशावेळी सुद्धा तुम्हाला सेफ्टी पिनचा वापर करता येतो.
महिलांना केसांत गजरा किंवा फुलं माळायला आवडतात. त्यामुळे अशावेळी तुम्ही सेफ्टी पिनचा वापर करू शकता.