Mushroom Toast Recipe : वजन होईल झटपट कमी, सकाळच्या नाश्त्याला खा प्रोटीनयुक्त मशरूम टोस्ट

Shreya Maskar

मशरूम टोस्ट

मशरूम टोस्ट बनवण्यासाठी मशरूम, ब्रेड, कांदा, बटर, लसूण, काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स, कोथिंबीर, मीठ, चीज आणि मिरची इत्यादी साहित्य लागते.

Mushroom Toast | yandex

लसूण

मशरूम टोस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये बटर टाकून त्यात बारीक चिरलेली लसूण आणि कांदा घालून व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून घ्या.

garlic | yandex

मशरूम

यात पातळ - लांब मशरूमचे काप मिक्स करा. पाणी निघून जाईपर्यंत मशरूम छान शिजवून घ्या. एक वाफ काढा.

Mushrooms | yandex

मसाले

त्यानंतर काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, हिरव्या मिरचीचे तुकडे घालून मिक्स करा. तुम्ही यात तुमच्या आवडीचे जास्तीचे मसाले देखील टाकू शकता.

Spices | yandex

ब्रेड

पॅन गरम करून त्यात बटर टाकून ब्रेड दोन्ही बाजूंनी भाजून चांगले खरपूस भाजून घ्या. त्यानंतर त्यावर पुदिना चटणी आणि सॉस लावा.

Bread | yandex

चीज

त्यानंतर ब्रेडवर तयार केलेले मशरूमचे सारण छान पसरवा. तसेच भरभरून चीज घाला. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मशरूम टोस्ट भाजून घ्या.

Cheese | yandex

टीप

तुम्हाला आवडत असेल तर यात तुम्ही बारीक पनीरचे काप देखील टाकू शकता. यामुळे मशरूम टोस्ट आणखी हेल्दी होईल.

Mushroom Toast | yandex

फायदे

तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आवर्जून नाश्त्याला मशरूम टोस्ट खा.

Weight Loss | yandex

NEXT : कुरकुरीत अन् झणझणीत भरली भेंडी, चव अशी की खातच राहाल

Bharli Bhendi Recipe | Google
येथे क्लिक करा...