Shreya Maskar
महाराष्ट्रावर मोंथा चक्रीवादळाचे संकट ओढावले आहे. पुढील १२ तासात चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. पण चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातील किनारी भागातही बसत आहे.
चक्रीवादळामुळे कोकणात सोसाट्याच्या वाऱ्यासह समुद्र खवळल्याचे चित्र आहे. त्यामुळे समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. याचा परिणाम पर्यटनावरही झाल्याचे दिसतेय. खराब हवामानामुळे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्ला बंद करण्यात आला आहे. हा किल्ला चारही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जंजिरा किल्ला पाहण्यासाठी शेकडो पर्यटकांनी जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी गर्दी केली होती. मात्र हवामानातील बदलामुळे त्यांना जंजिरा किल्ला पाहता आला नाही.
सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेता शिडाच्या आणि इंजिन बोटी समुद्रात उतरवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे जंजिरा किल्ल्या पर्यंत पर्यटकांना जाता आले नाही. त्यामुळे जंजिरा किल्ल्याचे दरवाजे बंद केले गेले.
पुरातत्त्व विभागाने सांगितल्यानुसार, मेरिटाइम बोर्डाकडून पुढील आदेश येईपर्यंत किल्ला बंद ठेवला जाईल. महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे सागरी प्रवास बंद करण्यात आला आहे.
महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे सागरी प्रवास बंद करण्यात आला आहे.
जंजिरा किल्ला समुद्राच्या मधोमध असूनही त्यात गोड्या पाण्याचे दोन तलाव आहेत. हे किल्ल्याचे मोठे वैशिष्ट्ये आहे.
जंजिरा किल्ल्याचे प्रवेशद्वार जवळ गेल्याशिवाय दिसत नाही, त्यामुळे शत्रूंना किल्ल्याच्या जवळ येणे कठीण होते. जंजिरा किल्ल्याचे इतिहासात खूप महत्त्वाचे स्थान आहे. जंजिरा किल्ला अरबी समुद्रात एका बेटावर असलेला एक अभेद्य जलदुर्ग आहे. जंजिरा किल्ल्याची तटबंदी आजही खूप मजबूत आहे.