ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुंबईचा वडापाव तर संपूर्ण जगभरात फेमस आहे.
मुंबईकर नेहमीच वडापावमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात.
मुंबईत वडापावमध्ये आता चुरा किंवा कॉर्नदेखील टाकले जातात.
मुंबईत तुम्हाला चुरा पावदेखील मिळेल.
चुरा पाव बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात बेसन पीठ घ्यायचे आहे.
त्यात थोडी मिरची पावडर आणि ओवा टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाका.
आवश्यकतेनुसार पाणी टाका आणि मस्त मिक्स करा. यानंतर कढईत तेल तापत ठेवा.
त्यात हे बेसन पीठ वरुन सोडा. जेणेकरुन त्याचे बारीक बारीक गोळे होती.
हे मस्त कुरकुरीत झाल्यानंतर काढून घ्या.
पावाला मस्त चटणी लावा. त्यात हा चुरा भरा आणि मनसोक्त खा.