Dahanu Picnic : हिवाळ्यात प्रत्येक वीकेंड होईल खास, फिरा डहाणूजवळील 'हे' ६ सुंदर वन डे पिकनिक स्पॉट्स

Shreya Maskar

डहाणू - हिवाळा

हिवाळा सुरू झाला की अनेकांना कुटुंबीय, मित्रमंडळी किंवा जोडीदारासोबत एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याचे वेध लागतात. मुंबईपासून जवळ असलेला पालघर जिल्ह्यातील डहाणू परिसर छोट्या सहलीसाठी लोकप्रिय आहे.

Dahanu - Winter | google

डहाणू बीच

डहाणूला गेल्यानंतर सर्वात आधी भेट द्यावी असे ठिकाण म्हणजे डहाणू बीच. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर पसरलेला हा सुंदर समुद्रकिनारा शांत वातावरणासाठी ओळखला जातो. शहरातील गर्दी आणि गोंगाटापासून दूर काही वेळ निवांत घालवायचा असेल तर हे ठिकाण उत्तम आहे.

Dahanu Beach | pinterest

बोर्डी बीच

डहाणूपासून साधारण १२ किलोमीटर अंतरावर असलेला बोर्डी बीच हा निसर्गप्रेमींसाठी सुंदर पर्याय आहे. डहाणू-बोर्डी परिसर साधारण १७ किलोमीटरच्या समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील शांत वातावरण आणि कमी गर्दीमुळे पर्यटकांना निवांत वेळ घालवता येतो.

Bordi Beach | pinterest

असवली धरण

शहरातील गोंगाटापासून दूर जाऊन निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. हिवाळ्यात येथील वातावरण आल्हाददायक असते. पक्ष्यांचे आवाज, डोंगररांगा आणि जलाशयाचे सुंदर दृश्य मन प्रसन्न करतात.

Asvali Dam | pinterest

बहरोट लेणी

डहाणू परिसरातील ऐतिहासिक आणि साहसी पर्यटनाचा अनुभव घ्यायचा असेल तर बहरोट लेणी हा एक उत्तम पर्याय आहे. येथे पोहोचण्यासाठी डोंगर चढावा लागतो. त्यामुळे हे ठिकाण केवळ पर्यटनासाठीच नाही तर ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी हे लोकेशन खूप खास ठरेल.

Bahirot Caves | google

महालक्ष्मी मंदिर

डहाणू परिसरातील आणखी एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणजे विवळवेढे येथील महालक्ष्मी मंदिर. देवी महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी येथे अनेक भाविक येतात. मंदिर परिसरातील शांत आणि प्रसन्न वातावरण अनुभवता येते.

Mahalakshmi Temple | google

कसं जाल?

तुम्ही मुंबई किंवा विरार वरून डहाणू ट्रेन पकडून प्रवास करा. डहाणू स्टेशनला उतरून पुढे रिक्षाने वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट द्या.

How to Reach? | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

Sangli Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...