Mumbai : ना मरीन ड्राइव्ह, ना जुहू चौपाटी; मुंबईच्या गजबजाटात लपलाय 'हा' अथांग समुद्रकिनारा

Shreya Maskar

मुंबई

मुंबईत अंधेरी येथे वर्सोवा बीच वसलेला आहे. तुम्ही येथे वीकेंडला फॅमिलीसोबत निवांत वेळ घालवू शकता. पावसाळ्यात येथील सौंदर्य आणखी खुलते.

Mumbai | google

वर्सोवा बीच

वर्सोवा बीच वरून संध्याकाळी सूर्यास्ताचे सुंदर दर्शन होते. संध्याकाळी निवांत फेरफटका मारण्यासाठी स्थानिक लोक येथे येतात. येथे तुम्हाला सी-फूडचा देखील आनंद घेता येतो.

Versova Beach | google

बोटिंग

वर्सोवा बीचवर बोटिंग करता येते. तसेच घोडेस्वारीचाही आनंद घेता येतो. येथे लहान मुलं वाळूत किल्ले बनवताना दिसतात. तसेच मोठी मुलं क्रिकेट, फुटबॉल खेळतात.

boating | google

कसं जावं?

अंधेरीहून तुम्ही मेट्रोने वर्सोवा स्टेशनला उतरा. स्टेशनपासून चालत अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर वर्सोवा समुद्रकिनारा आहे. तसेच तुम्ही अंधेरी स्टेशनहून रिक्षाने देखील वर्सोवा बीचवर पोहचू शकता.

how to go | google

मुंबईतील हिडन बीच

गजबजलेल्या मुंबईत अनेक शांत किनारे आहेत. उदा. मानोरी बीच, दाना पानी बीच, उत्तन बीच नक्की येथे फिरायला जा.

Hidden Beach in Mumbai | google

जुहू बीच

वर्सोवा बीच हा जुहू बीचसाठी शांत पर्याय म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे. हे ठिकाण कपलसाठी देखील छान आहे. निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवता येतो.

Juhu Beach | google

स्वच्छता

वर्सोवा बीच हा स्वच्छता समुद्रकिनारा आहे. येथे मऊ, काळ्या आणि पांढऱ्या वाळू पाहायला मिळते.

Cleanliness | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : 'दिवा जंक्शन'जवळील ५ मनमोहक पर्यटन स्थळे, पावसाळ्यात फॅमिली ट्रिप प्लान कराच

Diva Junction | saam tv
येथे क्लिक करा...