ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जुहू बीच हा मुंबईतील सर्वात लोकप्रिय आणि गर्दी असलेला समुद्रकिनारा आहे. येथील स्ट्रीट फूड देखील खूप प्रसिद्ध आहे.
गणपती विसर्जन आणि लोकल फूडसाठी प्रसिद्ध असलेल्या या समुद्रकिनाऱ्याला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात.
मरीन ड्राइव्हला 'क्वीन्स नेकलेस' असेही म्हणतात. तुम्ही येथून सूर्यास्त पाहण्याचा हा एक अतिशय सुंदर अनुभव घेऊ शकता.
येथील नैसर्गिक सुंदरता आणि शांत वातावरणाचा तुम्ही आनंद घेऊ शकता.
मढ आयलंड बीच शांत वातावरण आणि नयनरम्य दृस्यांसाठी प्रसिद्ध आहे. हा बीच सुट्टी आणि पिकनिकसाठी बेस्ट आहे.
हा समुद्रकिनारा शांत आणि सुंदर आहे. अक्सा बीच मुंबई शहराच्या गोंगाटातून थोडा वेळ दूर शांतता अनुभवण्यासाठी एक चांगली जागा आहे.
मुंबईच्या इतर बीचपेक्षा येथे कमी गर्दी पाहायला मिळते. हा बीच गर्दीपासून दूर एक शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे.