Vasai Tourism : वसईजवळ फिरायचंय? वन-डे पिकनिकसाठी 'ही' ठिकाणं आहेत परफेक्ट

Shreya Maskar

पावसाळा

पावसाच्या सरींमुळे निसर्गाचे रुप बदलते. तुम्हाला भर पावसात जवळच ट्रिप प्लान करायची असेल तर वसई उत्तम आहे. येथील सुंदर ठिकाणांची नावे नोट करा.

Monsoon | google

वसई किल्ला

वसई किल्ला हा १६ व्या शतकातील ऐतिहासिक ठिकाण आहे. विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या या किल्ल्यावर, भव्य दगडी अवशेष, जुने टेहळणी बुरूज आणि कमानी पाहायला मिळतात.

Vasai Fort | google

सुरुची बीच

हिरव्यागार झाडीने सुरुची बीच वेढलेला आहे. येथे बीच क्रिकेट, व्हॉलीबॉल खेळण्यासाठी आणि सुंदर सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.

Suruchi Beach | google

नागाव बीच

काळ्या वाळूचा अनोखा पट्टा आणि अत्यंत शांत वातावरण नागाव बीचवर पाहायला मिळते. हा खूपच कमी गर्दी असलेला किनारा आहे.

Nagaon Beach | google

भुईगाव बीच

भुईगाव बीचवरून सूर्यास्ताचा अनोखा नजारा पाहायला मिळतो. येथे पावसाळ्यात तुफान मजा-मस्ती करता येते. तसेच या किनाऱ्यावर फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.

Bhuigaon Beach | google

चिंचोटी धबधबा

तुंगारेश्वरच्या डोंगररांगांमध्ये चिंचोटी धबधबा वसलेला आहे. हे ट्रेकिंगचे सुंदर लोकेशन आहे. हिरव्यागार जंगलातून चालत जाऊन एका धबधब्यापर्यंत पोहोचवतो, जिथे तुम्हाला थंडावा मिळतो.

Chinchoti Waterfall | google

कसं जाल?

वसई स्टेशनला उतरल्यावर पुढे तुम्ही रिक्षाने किंवा बसने वर सांगितलेल्या सर्व पिकनिक स्पॉट्सवर जाऊ शकता. येथे फिरण्याची मजा औरच आहे.

How to get there? | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : धबधबा, ट्रेकिंग अन् अ‍ॅडव्हेंचर; वांगणीजवळील 'हे' ठिकाण पावसाळ्यात फिरायला आहे खास

Vangani Waterfall | AI PHOTO
येथे क्लिक करा...