Shreya Maskar
येणाऱ्या वीकेंडला मुंबईजवळच फिरण्याचा प्लान करत असाल तर भागीरथी धबधबा बेस्ट ऑप्शन आहे. येते इंद्रधनुष्याचा सुरेख नजारा पाहायला मिळेल.
भागीरथ धबधब्याला भागीरथी धबधबा आणि वांगणी धबधबा असेही म्हणतात. पावसाळ्यात हा धबधबा स्वर्गाहून सुंदर दिसतो.
अंबरनाथ तालुक्यातील वांगणीजवळील बेडीसगाव भागीरथी धबधबा वसलेला आहे. मुंबईपासून सुमारे ६८ किमी अंतरावर आणि मध्य रेल्वे मार्गावरील वांगणी रेल्वे स्थानकापासून पूर्वेकडे साधारण २ किमी अंतरावर हे ठिकाण आहे.
भागीरथ धबधबा हे पावसाळ्यातील एक निसर्गरम्य आणि कमी गर्दीचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.
भागीरथ धबधबा पावसाळ्यातील दाट हिरवळ, डोंगराच्या पायथ्यापासूनचा छोटासा ट्रेक, शांत वातावरणात फेरफटका आणि वन डे ट्रिपसाठी लोकप्रिय आहे.
भागीरथ धबधब्याला गेल्यावर रॉक क्लाइंबिंग आणि रॅपलिंगची संधी तुम्हाला मिळते. मित्रांसोबत ट्रिप प्लान करण्यासाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
वांगणी स्टेशनला उतरा. तेथून पुढे रिक्षाने तुम्ही भागीरथ धबधब्याजवळ पोहचू शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.
NEXT : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण