Shreya Maskar
तुम्ही जर टिटवाळ्याला राहत असाल किंवा टिटवाळ्याला ट्रिपला गेला असाल तर टिटवाळ्याजवळील हे सुंदर ठिकाण पाहायला अजिबात विसरू नका.
माळशेज घाट हे टिटवाळ्याजवळील सर्वात लोकप्रिय आणि थंड हवेचे ठिकाण आहे. टिटवाळ्यापासून सुमारे ९६ किमी अंतरावर माळशेज घाट आहे.
माळशेज घाट हा महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील एक निसर्गरम्य घाटमार्ग आहे. पावसाळ्यात तुम्हाला फोटोशूट करायचे असेल तर माळशेज घाटला नक्की जा.
पावसाळ्यात येथे तुम्हाला विविध पक्षी देखील पाहायला मिळतात. स्थलांतरित फ्लेमिंगो पाहण्यासाठी येथे अनेक पर्यटक येतात.
पावसाळ्यात खडकाळ कड्यांवरून अनेक धबधबे वाहतात. हे धबधबे थेट रस्त्यावरून किंवा रस्त्याच्या कडेने वाहतात. येथे पावसाळ्यात धुक्याने वेढलेल्या दऱ्या पर्यटकांचे आकर्षित करतात.
माळशेज घाटला गेल्यावर माळशेज घाट व्ह्यू-पॉइंट , पिंपळगाव जोगा धरण , हरिश्चंद्रगड किल्ला यांचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
टिटवाळा ते कल्याण जंक्शनपर्यंत ट्रेनने प्रवास करा. कल्याणवरून रिक्षाने तुम्ही माळशेज घाटापर्यंत पोहचाल. तसेच तुम्ही टिटवाळा ते माळशेज घाट येथे रोड ट्रिप देखील करून शकता. मित्रांसोबत खूपच मजा येईल.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.