Raigad Beach : रिमझिम पाऊस , खळखळणाऱ्या लाटा अन् सुरूची झाडं; मान्सूनमध्ये खुलतो 'हा' समुद्रकिनारा

Shreya Maskar

रायगड

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात, कोकण किनारपट्टीवर निसर्गरम्य दिवेआगर बीच वसलेला आहे. पावसाळ्यात वीकेंडला तुम्ही येथे ट्रिप प्लान करा.

Raigad | google

दिवेआगर बीच

दिवेआगर बीच हा ५ किलोमीटर लांबीचा स्वच्छ आणि गर्दीविरहित पांढऱ्या वाळूचा किनारा, सौम्य लाटा आणि 'सँड बबल क्रॅब्स' (वाळूतील खेकडे) व स्थलांतरित सी-गल्स (समुद्री पक्षी) यांच्यासाठी प्रसिद्ध आहे.

Diveagar Beach | google

निसर्गरम्य किनारा

नारळ आणि सुपारीच्या बागांच्या पार्श्वभूमीवर असलेला एक शांत आणि स्वच्छ बीच आहे. पावसाळ्यात याचे सौंदर्य आणखी खुलते. तसेच तुम्ही येथे भन्नाट फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.

Scenic beach | google

वॉटर स्पोर्ट्स

दिवेआगरला गेल्यावर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घ्या. हे ठिकाण पॅरासेलिंग, बनाना बोट राईड, जेट स्कीइंग आणि सर्फिंग यांसारख्या उपक्रमांसाठी लोकप्रिय आहे.

Water sports | google

सुवर्ण गणेश मंदिर

दिवेआगर बीचजवळच सुवर्ण गणेश मंदिर आहे. येथे शुद्ध सोन्याच्या गणेश मूर्ती आहे. हा समुद्रकिनारा नारळ-सुपारीच्या हिरव्यागार बागांनी वेढलेला आहे.

Temple | google

निसर्गरम्य किनारी रस्ते प्रवास

दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर यांना जोडणाऱ्या किनारी महामार्गावरून निसर्गरम्य प्रवासाचा आनंद घ्या.

Travel along scenic coastal roads | google

अस्सल कोकणी जेवण

दिवेआगर बीचजवळ खाण्यापिण्याची आणि राहण्याची उत्तम सोय आहे. तुम्ही येथे पारंपरिक कोकणी सी-फूड (मासे) आणि घरगुती शाकाहारी जेवणाचा आस्वाद घ्या.

Authentic Konkani food | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : पांढरी शुभ्र वाळू अन् निळेशार पाणी; रत्नागिरीचा 'हा' समुद्रकिनारा पावसाळ्यात होतो स्वर्गाहून सुंदर

Ratnagiri Beach | AI PHOTO
येथे क्लिक करा...