Shreya Maskar
कोकणात रत्नागिरीपासून रत्नागिरीपासून दक्षिणेस सुमारे २१ ते २५ किमी अंतरावर असलेल्या गणेशगुळे या दुर्गम गावात निसर्गरम्य गणेशगुळे बीच वसलेला आहे.
गणेशगुळे बीच येथील शांत वातावरण, स्वच्छता, पाचूच्या रंगासारखे निळसर पाणी, तसेच पर्वतांनी वेढलेला आणि पांढऱ्या वाळूचा किनारा यासाठी प्रसिद्ध आहे.
गणेशगुळे बीच हा फारसा कोणाला माहित नाही त्यामुळे इतर बीचपेक्षा तुलनेने येथे कमी गर्दी असते. तुम्ही येथे सोलो ट्रिप देखील प्लान करू शकता.
कोकणात जर सूर्योदय-सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायचा असेल तर गणेशगुळे बीचला नक्की भेट द्या. येथून सू्र्यास्ताचा सुरेख नजारा पाहायला मिळतो.
समुद्र दोन्ही बाजूंना टेकड्या आणि नारळ , काजूच्या दाट बागांनी वेढलेला आहे. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट करू शकता.
हा बीच पोहणे, सनबाथिंग, स्नॉर्कलिंग, डायव्हिंग, सर्फिंग आणि पॅरासेलिंग यांसारख्या उपक्रमांसाठी हे ठिकाण लोकप्रिय आहे.
गणेशगुळे बीचजवळच ऐतिहासिक गणेशगुळे मंदिर आहे, जिथे स्वयंभू गणेशमूर्ती आणि पांडवकालीन प्राचीन विहीर आहे. कोकण भागातील गणेशगुळे बीच जून ते सप्टेंबर या काळात आवर्जून जावे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.