Nashik : धबधबे, द्राक्षांचेमळे अन् धुक्याची चादर; नाशिकमध्ये लपलेली 'ही' ठिकाणे पावसाळ्यात नक्की पाहा

Shreya Maskar

नाशिक

नाशिक हे प्रमुख हिंदू तीर्थक्षेत्र, भारताची वाईन कॅपिटल आणि महाकाव्य रामायणाशी सखोलपणे जोडलेले शहर म्हणून प्रसिद्ध आहे.

Nashik | google

दुगारवाडी धबधबा

दुगारवाडी धबधबा दाट हिरवाईने नटलेल्या आणि अर्ध-वनक्षेत्र असलेल्या भागात स्थित आहे. हा धबधबा अजूनही पर्यटकांच्या गर्दीपासून दूर आणि शांत वातावरणात आहे.

Dugarwadi Falls | google

अंजेनेरी पर्वत

नाशिकपासून सुमारे २० किमी अंतरावर असलेला अंजेनेरी पर्वत हे भगवान हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. येथे ट्रेकिंगचा आनंद घेता येतो. आजूबाजूच्या दऱ्यांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.

Anjeneri Mountain | google

रामशेज किल्ला

रामशेज किल्ला हे इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे गेल्यावर किल्ल्याचे प्राचीन तट, लपलेल्या गुहा आणि जुने जलसाठे पाहायला विसरू नका.

Ramshej Fort | google

ब्रह्मगिरी पर्वत

पवित्र गोदावरी नदीचा उगम याच पर्वतांतून होतो असे मानले जाते. येथील ट्रेक दरम्यान त्र्यंबक परिसराचे विहंगम दृश्य दिसते.

Brahmagiri mountain | google

सोमेश्वर धबधबा

धबधब्या खाली चिंब भिजायचे असेल तर सोमेश्वर धबधब्याला नक्की भेट द्या. वाहत्या पाण्यामुळे परिसरातील वातावरण निसर्गरम्य बनते.

Someshwar Falls | google

गोंदेश्वर मंदिर

सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर हे मध्ययुगीन काळातील वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. शांत वातावरणात असलेल्या या मंदिरात दगडांवरील सुंदर कोरीव काम पाहायला मिळते.

Gondeshwar Temple | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : पावसाच्या सरींमध्ये खुलून दिसतात महाराष्ट्रातील 'ही' सुंदर ठिकाणं, मान्सून संपण्यापूर्वी नक्की फिरा

Maharashtra | AI PHOTO
येथे क्लिक करा...