Shreya Maskar
पालघरमध्ये जव्हार हे थंड हवेचे ठिकाण आहे. जव्हारला 'मिनी महाबळेश्वर' म्हणूनही ओळखले जाते. हिरव्यागार टेकड्या, धबधबे, थंडगार वातावरण आणि वारली चित्रकलेची समृद्ध परंपरा हे येथील वैशिष्ट्य आहे.
सूर्यमाळ हिल स्टेशन हे पालघरमध्ये आहे. गर्दीपासून दूर, उंचसखल डोंगररांगा आणि निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी सूर्यमाळ हा एक चांगला पर्याय आहे.
अहिल्यानगर येथे भंडारदरा हे हिल स्टेशन आहे. आर्थर लेक, हिरवेगार सह्याद्री, धबधबे आणि डोंगरांच्या कुशीत वसलेले शांत परिसर यामुळे भंडारदरा मन प्रसन्न करणारे ठिकाण आहे.
नाशिक येथे इगतपुरी हे हिल स्टेशन आहे. धुक्याने झाकलेले डोंगर, हिरव्या दऱ्या आणि सह्याद्रीच्या निसर्गरम्य वाटा अनुभवण्यासाठी इगतपुरी उत्तम आहे. पावसाळ्यात येथील सौंदर्य खुलते, तर हिवाळ्यातही हवामान आल्हाददायक असू शकते.
नंदुरबार येथे तोरणमाळ हिल स्टेशन आहे. सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले तोरणमाळ हे महाराष्ट्रात लपलेले थंड हवेचे ठिकाण आहे. यशवंत तलाव, हिरव्यागार दऱ्या आणि डोंगरमाथ्यावरील शांत वातावरण ही येथील खास आकर्षणे आहेत.
पुणे-अहिल्यानगर परिसरात माळशेज घाट आहे. उंच डोंगर, खोल दऱ्या, धुक्याने वेढलेले घाटरस्ते आणि पावसाळ्यात वाहणारे धबधबे यांमुळे माळशेज घाट लोकप्रिय आहे.
जव्हारच्या आसपासचे शिरपामाळ हे ऐतिहासिक महत्त्व असलेले उंच ठिकाण आहे. येथून डोंगररांगांचे दृश्य पाहता येते आणि जव्हारच्या सहलीत या ठिकाणाचा समावेश करता येतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.