Virar : विरारमध्ये वीकेंड एन्जॉय करायचाय? मग 'ही' ५ ठिकाणं तुमच्या लिस्टमध्ये असायलाच पाहिजे

Shreya Maskar

विरार

येणाऱ्या वीकेंडला मुंबईजवळ ट्रिप प्लान करायची असेल तर विरार हे बेस्ट लोकेशन आहे. तुम्ही विरारला ट्रेनने प्रवास करा. त्यानंतर स्टेशनपासून खाली दिलेल्या ठिकाणी बस किंवा रिक्षाने जाऊ शकता.

Virar | google

फूलपाडा धरण

फूलपाडा हिरव्यागार वनराईने वेढलेले एक निसर्गरम्य धरण आहे. येथे साध्या-सोप्या ट्रेकिंगच आनंद घेता येतो. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे थंड वातावरण अनुभवता येते.

Phulpada Dam | google

वन ट्री हिल पॉइंट

वन ट्री हिल पॉइंट हा पापडखिंडी धरणाजवळचा एक शांत उंच ठिकाणचा व्ह्यू पॉइंट आहे. हे ठिकाण शहरी जीवनातून एक शांत निवांतपणा देते.

One Tree Hill Point | google

शिरगाव तलाव

शिरगाव तलाव हे विरार (पूर्व) येथील कुंभारपाडा परिसरात असलेले एक सुंदर आणि शांत गोड्या पाण्याचे तलाव आहे.

Shirgaon Lake | google

नवापूर बीच

नवापूर बीच वीकेंड ट्रिपसाठी सुंदर ठिकाण आहे. येथून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तसेच तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.

Nawapur Beach | google

राजोडी बीच

तुम्हाला बोटिंगचा आनंद घ्यायचा असेल तर राजोडी बीचला नक्की भेट द्या. येथे घोडेस्वारीचा आनंदही घेता येतो. हे ठिकाण जलक्रीडांसाठी प्रसिद्ध आहे.

Rajodi Beach | google

वसई किल्ला

वसई किल्ल्याला ऐतिहासिक काळात बसेन किल्ला आणि फोर्ट ऑफ सेंट सेबॅस्टीयन या नावांनी ओळखले जात असे. विरारजवळील हे प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण आहे.

Vasai Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : येणारा वीकेंड कुटुंबासोबत प्लान करा, फिरा कळव्याजवळचे ५ मस्त मान्सून पिकनिक स्पॉट्स

Kalwa Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...