Manasvi Choudhary
महाराष्ट्रात जवळपास सर्वच हॉटेलमध्ये झणझणीत वडापाव असतो. बटाटा वडापाव हा मुंबईकरांचा प्रसिद्ध पदार्थ आहे.
मात्र अनेकांना मुंबईस्टाईल झणझणीत बटाटा वडा बनवता येत नाही.
बटाटा वडा घरी बनवण्याची रेसिपी सोपी आहे. तुम्ही देखील नाश्त्याला झणझणीत बटाटा वडा बनवू शकता.
बटाटा वडा बनवण्यासाठी उकडलेले बटाटे, बेसन, लसूण, आलं, हिरवी मिरची,कढीपत्ता, मीठ, तेल, धना पावडर हे साहित्य एकत्र करा.
मुंबईस्टाईल वडा बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये बेसन, धना पावडर, मीठ, मसाला आणि पाणी हे मिश्रण एकजीव करा.
यानंतर हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण याची एकत्र पेस्ट करा म्हणजे वडा झणझणीत होईल.
दुसऱ्या एका भांड्यामध्ये उकडलेले बटाटे आणि बारीक केलेले मिरची, लसूण पेस्ट मिक्स करा. तयार मिश्रणाला गोलाकार वड्याचा आकार द्या.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलात बटाट्याचे वडे तळून घ्या. वडे दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत फ्राय करा.
अशाप्रकारे कुरकुरीत वडे तळल्यानंतर पाव किंवा भाकरी सोबत तुम्ही नाश्त्याला सर्व्ह करू शकता.