Manasvi Choudhary
अनेकदा मुंबईला फिरायला गेल्यावर पर्यटक स्ट्रीट स्टाईल पदार्थांचा आस्वाद घेतात.
स्ट्रीट स्टाईल फेमस शेवपुरी खायला खवय्यांची गर्दी असते.
स्ट्रीट स्टाईल शेव पुरी घरी करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
शेवपुरी बनवण्यासाठी पुरी, चाट मसाला, मीठ, पाणी पुरी, जिरा पावडर, बारीक शेव, खजूर, सुक्या मिरच्या, हिरव्या मिरच्या, काळे मीठ, टोमॅटो, दालचिनी, गूळ, कांदा, कोथिंबीर, लसूण, बटाटे हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम बारीक किसलेला गूळ आणि खजूर वेगवेगळ्या भांड्यात भिजत घाला.
एका बाजूला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून ठेवा.
नंतर गॅसवर भांड्यात गूळ पाणी चांगले उकळून घ्या नंतर यात दालचिनीचे दोन तुकडे दालचिनी घाला.
संपूर्ण मिश्रणात खजूर पाणी घालून उकळून द्या अशाप्रकारे गोड चटणी तयार असेल.
कोथिंबीर, लाल मिरची, हिरवी मिरची स्वच्छ धुवून यामध्ये लसूण घालून मिक्सरला बारीक वाटून घ्या
एका प्लेटमध्ये पुरी घ्या यामध्ये उकडलेला बटाटा लावून बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घाला.
नंतर यावर लाल तिखट मसाला, चाट मसाला, मीठ, पाणी पुरी मसाला, गोड चटणी घाला.
अशाप्रकारे शेवपुरी सर्व्हसाठी त्यावर बारीक शेव घाला.