Manasvi Choudhary
मागील गेल्या २२ तासांपासून मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरील वाहुतक ठप्प झाली आहे.
मुंबईला जाणाऱ्या मार्गावर गॅस टँकर पलटी झाल्याने ही वाहतूक खोळंबली आहे.
महामार्गावर टँकरमधील प्रोपलिन गॅस लिक झाल्याने सुरक्षेच्या कारणामुळे पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूकन थांबवण्यात आली.
प्रोपलिन एक रंगहीन आणि ज्वलनशील वायू आहे. पेट्रोकेमिकल उद्योगात या गॅसचा वापर प्रामुख्याने होतो.
हा वायू उपयुक्त असला तरी त्याचा धोका मोठ्या प्रमाणावर आहेत. हा वायून अतिशय लवकर पेट घेतो.
हवेमध्ये हा वायू मिसळला आणि तिथे ठिणगी किंवा उष्णता आली तर मोठा स्फोट होऊ शकतो.
प्रोपलिन हा वायू पसल्याने व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. जास्त प्रमाणात श्वास घेतल्यास चक्कर येणे. गुदमरायला होणे, गुंगी येणे या समस्या होऊ शकतात.