ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गेले काही दिवस पावसाने सर्वत्र थैमान घातला आहे.
ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.
अशात एखाद्या ठिकाणी अडकल्यास योग्य काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. यासाठी तुम्ही पुढील गोष्टी करू शकता.
कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीत शांततेत विचार करणे आवश्यक आहे. असे न केल्यास चुकीचा निर्णय घेतला जाऊन परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.
पावसाच्या दिवसात तुमच्या जवळ नेहमी प्लास्टिकच्या पिशव्या ठेवा. यामध्ये तुमचे सामान सुरक्षित राहू शकते. छोट्या पिशव्यांनी डोकं आणि पाय कव्हर करू शकता.
मुसळधार पावसात काहीवेळा वीज पडण्याची शक्यता असते. त्यामुळे एखादे दुकान किंवा बसस्टॉपचा आसरा घ्या. झाडाखाली उभे राहील्यास वाऱ्याने फांदी पडण्याची शक्यता असू शकते.
मोजे, कपडे भिजले असतील तर थंडी लागून सर्दी होण्याची शक्यता असते. बुटांच्या व कपड्यांच्या आतल्या बाजूला टिशू पेपर किंवा न्यूजपेपरचे तुकडे भरा. ते पाणी शोषून घेतात व उब टिकून राहते.
अंधार असेल तर, एखादी प्प्लास्टिकची, पातळ, पारदर्शक पाण्याची बाटली मोबालच्या फ्लॅशलाईटवर धरा. दिव्यासारखा प्रकाश पसरेल.
पाणी भरलेल्या रस्त्याने चालणे टाळा. खोल खड्डा असल्यास अपघात होण्याची शक्यता असते. उंचवटा असलेल्या भागावरून चाला.