Shreya Maskar
पालघरमध्ये खांड धरण (Khand Dam) नावाचे एक सुंदर पर्यटन स्थळ लपलेले आहे. खांड धरण विक्रमगड जवळ वसलेले आहे. येथे तुम्ही वीकेंडला वन डे ट्रिप प्लान करू शकता.
खांड धरणाची तुलना पर्यटकांनी 'मुंबईजवळील लडाख'शी केली आहे. तुम्ही येथे थंडगार वातावरणात फोटोशूटचा आनंद घेऊ शकता. स्वच्छ, निळे पाणी आणि शांत परिसरामुळे पर्यटक येथे आवर्जून येतात.
विरार आणि मुंबईपासून अवघ्या २ तासांच्या अंतरावर हे सुंदर ठिकाण वसलेले आहे. येथून सूर्यास्ताचा देखील सुंदर नजारा पाहायला मिळतो.
खांड धरण याला खडखड धरण असेही म्हणतात. खळखळणाऱ्या पाण्याच्या लाटांचा आवज तुम्हाला मंत्रमुग्ध करतो. येथे स्वच्छ पाणी पाहायला मिळते. सोलो ट्रिपसाठी देखील हे उत्तम ठिकाण आहे.
पाण्याचा उथळ प्रवाह, खडकांवरून वेगाने वाहणारे धरणाचे स्वच्छ पाणी पाहून तुम्हाला शांती मिळेल. तुम्ही काही मिनिटांत फ्रेश फिल कराल.
पाण्याचा उथळ प्रवाह, खडकांवरून वेगाने वाहणारे धरणाचे स्वच्छ पाणी पाहून तुम्हाला शांती मिळेल. तुम्ही काही मिनिटांत फ्रेश फिल कराल.
खांड धरणाजवळ विक्रमगड किल्ला आहे. हे एक निसर्गाच्या सानिध्यात लपलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. येथे तुम्ही वीकेंडला मित्रांसोबत आवर्जून जा.
पालघरमध्ये केळवा बीच, डहाणू आणि बोर्डी बीच , सुरुची बीच, अर्नाळा किल्ला, केळवा किल्ला, शिरगाव किल्ला अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.