Bhayandar : भाईंदरजवळील ऐतिहासिक वैभव! वीकेंडला मित्रांसोबत 'या' किल्ल्यांवर करा भटकंती

Shreya Maskar

भायंदर

भायंदरच्या सर्वात जवळ असलेले ऐतिहासिक ठिकाण म्हणजे घोडबंदर किल्ला होय. हा किल्ला मीरा-भायंदर परिसरात आहे. वीकेंडला तुम्ही येथे नक्की भेट द्या.

Bhayandar | google

घोडबंदर किल्ला

हिरवाईच्या कुशीत आणि उल्हास नदीच्या खाडीकाठी वसलेला घोडबंदर किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील (मीरा-भाईंदर जवळ) एक ऐतिहासिक वारसा आहे. पोर्तुगीज, मराठे आणि ब्रिटिश अशा तिन्ही सत्तांचा साक्षीदार हा किल्ला आहे.

Ghodbunder Fort | google

व्यापाराचे बंदर

घोडबंदर किल्ला हा पोर्तुगीजांची पूर्वीची नौदल छावणी आणि घोड्यांच्या व्यापाराचे बंदर म्हणून ओळखला जायचा. इतिहासात या किल्ल्याला मोठे महत्त्व आहे.

A Trading Port | google

उत्तन किल्ला

उत्तन किल्ला ज्याला धारावी किल्ला किंवा डोंगरी किल्ला असेही म्हणतात. हा ठाणे जिल्ह्यातील (मीरा-भाईंदर) उत्तन भागात असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे.

Uttan Fort | google

उत्तन किल्ला आकर्षण

चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांविरुद्धच्या वसई मोहिमेत या किल्ल्याचा रणनीतिक वापर केला होता. हा एक उत्तम वीकेंड गेटवे असून, येथून विहंगम समुद्रकिनारा आणि उत्तन दीपगृह दिसते。

Attractions at Uttan Fort | google

वसई किल्ला

मीरा-भाईंदरजवळ वसई येथे वसई किल्ला हे ऐतिहासिक ठिकाण आहे. वसई किल्ल्याला बसीन किल्ला असेही म्हणतात. वसईचा किल्ला हा पोर्तुगीज आणि मराठा स्थापत्यशैलींचा एक उत्कृष्ट मिलाफ आहे.

Vasai Fort | google

वसई किल्ला इतिहास

मूळतः १५३३ मध्ये गुजरातच्या सुलतानाने बांधलेला वसई किल्ला १५३४ मध्ये पोर्तुगीजांनी ताब्यात घेतला. दोन शतकांहून अधिक काळ, गोव्यानंतर महत्त्वाच्या क्रमांकावर असलेल्या पोर्तुगीजांच्या 'उत्तर दरबाराचे' हे एक गजबजलेले आणि वैभवशाली मुख्यालय राहिले.

History of Vasai Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : शहराच्या गोंधळातून घ्या ब्रेक; पनवेलमधील डोंगररांगांनी वेढलेले 'हे' ठिकाण Summer ट्रिपसाठी बेस्ट

Panvel Travel | saam tv
येथे क्लिक करा...