Mumbai Beach : मुंबईजवळचं 'मिनी गोवा'! पावसाळ्यात निसर्ग प्रेमींसाठी परफेक्ट ठिकाण

Shreya Maskar

मुंबई बीच

मनोरी बीच हे उत्तर मुंबईतील मनोरी बेटावर वसलेले एक शांत आणि निसर्गरम्य किनारी ठिकाण आहे. पावसाळ्यात तुम्ही येथे वीकेंडला नक्की ट्रिप प्लान करा.

Mumbai Beach | google

मनोरी बीच

मनोरी बीचला येथील निवांत वातावरण आणि पोर्तुगीज-शैलीतील वास्तुकलेमुळे याला अनेकदा 'मिनी-गोवा' असेही म्हटले जाते. कमी बजेटमध्ये धमाल मजा करता येईल.

Manori Beach | google

कसं जाल?

मनोरी बीचच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन वेस्टर्न लाईनवरील मालाड हे आहे. तिथून तुम्ही स्थानिक बस किंवा रिक्षाने मार्वे बीचपर्यंत जाऊ शकता आणि त्यानंतर खाडी ओलांडण्यासाठी ५ ते १० मिनिटांच्या फेरीचा (बोटीचा) प्रवास करू शकता.

how do you go | google

निसर्ग सौंदर्य

मनोरी बीच निवांत ग्रामीण वातावरण आणि सूर्यास्ताच्या सुंदर दृश्यांसह एक शांत अनुभव देते. तुम्ही येथे मित्रमंडळी, फॅमिलीसोबत नक्कीच ट्रिप प्लान करू शकता.

Beauty of nature | google

बोटिंगचा आनंद

मनोरी बीचवर खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे. येथे सी-फूडचा आनंद घ्या. तसेच तुम्हाला येथे बोटिंगचा आनंद घेता येतो.

The joy of boating | google

पावसाळा

नारळ-पोफळीची आणि काजूची झाडांनी हा समुद्रकिनारा वेढलेला आहे. पावसाळ्यात येथे थंड वातावरण अनुभवता येते.

rainy season | google

समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका

मनोरी बीच चांदण्या रात्री समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी आणि अधूनमधून होणाऱ्या बीच पार्ट्यांसाठी ओळखले जाते.

A walk on the beach | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : महाराष्ट्रातील 'या' ५ मंदिरांमध्ये पाहायला मिळतो गणेशोत्सवाचा अद्भुत नजारा, दर्शनाला नक्की जा

Maharashtra | AI PHOTO
येथे क्लिक करा...